वाळूजमहानगर, (ता.22) – निवडणुकीचे अतिरिक्त काम सोपवण्यात आले आहे. त्यामुळे विधवा महिलांना संजय निराधार योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी तहसीलदारांना दिलेल्या एका निवेदनात वडगाव येथील एका नागरिकांनी केली आहे.
याबाबत वडगाव (को.) येथील दत्तप्रसाद फकीरचंद्र पुरे यांनी तहसीलदार, छत्रपती संभाजीनगर यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, वडगाव (को.) येथील संजय गांधी निराधार योजना (विधवा)चे लाभार्थी सुशीला गणेश बसैये त्यांची फाईल दोन वर्षानंतर मंजूर करण्यात असून ग्रामपंचायत ठराव व इतर आवश्यक कागदपत्रे संबंधित विभागात सादर करण्यात आली आहे. परंतु अद्यापही मंजुरी पत्र देण्यात आले नाही. मंजुरीतपत्रासाठी संबंधित कार्यालयात वेळोवेळी भेट दिली असता तेथील लिपिक असे सांगतात की, साहेबांकडे निवडणूक अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला असून ते कार्यालयात येत नाही. 4 जून पर्यंत शासकीय काम बंद राहील. त्यामुळे तात्काळ दखल घेण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
