वाळूजमहानगर (ता.25) :- सरकारी गायरानावरील झालेले अतिक्रमण काढण्याचा उच्च न्यायालय याचा निर्णय रद्द करण्यात यावा. या मागणीचे निवेदन जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायतच्या सदस्यांनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांना दिले आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की, शासकीय भूखंडावरील अतिक्रमण काढण्याचा मा. उच्यन्यायालयाचा निर्णय आहे. तो रद्द करण्याकरिता राज्य सरकारने स्थगिती प्रस्ताव सादर करावा. या मागणीचे निवेदन औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे दिले. यावेळी जोगेश्वरी ग्रामपंचायत सदस्य विलास सौदागर, सुरेश वाघमारे, शेख मोईन, कृष्णा काजळे, पंडित पनाड, नजिरखाँ पठाण, प्रभाकर काजळे, गणेश साबळे आदींनी केली आहे. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे गंगापूर तालुका अध्यक्ष दिलीप पाटील निरफळ, अरूण रोडगे, हरिदास चव्हाण आदींची उपस्थिती होती.