March 23, 2026

वाळुज महानगर (ता.3) :- भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने समोरील दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील चार जण जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (ता.3) रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास औरंगाबाद पुणे महामार्गावर झाला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लिंबे जळगावकडून दुचाकीवरून पती-पत्नी व दोन मुले असे चार जण शुक्रवारी (ता.3) रोजी कोबापूर झांजर्डेकडे जात होते. त्यांची दुचाकी औरंगाबाद नगर महामार्गावरील जिकठाण फाट्याजवळ येताच पाठीमागून भरधाव अज्ञात चार चाकी वाहन आले. या वाहनाने समोरील दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये बाळू नानासाहेब म्हस्के (वय 35), सोनू बाळू म्हस्के (वय 30) रुद्रा बाळू म्हस्के (वय 4) व श्रुती बाळू म्हस्के (वय 11) असे चार जण जखमी झाले. ते कोबापूर, झांजर्डे येथील असल्याचे सांगितले जाते. अपघाताची माहिती मिळताच श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिकेने अपघातस्थळी धाव घेत पायलट संदीप त्रिंबके यांनी राजू सुभाष खरात व इतर प्रवाशांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिके मध्ये शिफ्ट करून उपजिल्हा रुग्णालय गंगापूर येथे दाखल केले. याप्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या व्ही एल पाखरे यांच्या खबरीवरून वाळूज पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *