February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.27) – शेतकरी, जवान आणि शास्त्रज्ञ यांच्या कष्टावर देश उभा आहे, देशसेवेसारखे पुण्य दुसरे कोणतेही नाही. अग्निवीर योजनेच्या माध्यमातून शासनाने भारतीय सैन्यामध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणले असून तरुणांनी या संधीचा लाभ घेऊन देश सेवेसाठी अग्नीवीर बनावे. असे आवाहन सेवानिवृत्त मेजर सुभेदार मोहन कापसे यांनी रांजणगाव (पोळ) येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण प्रसंगी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सुधाकर थोरात होते. प्रमुख पाहुणे शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बोडखे, माजी सरपंच रावसाहेब पाटील बोडखे, राजू कुर्हाडे, सारंग कुर्हाडे, ग्रामपंचायत सदस्य विलास बोडखे, किशोर कुऱ्हाडे, सचिन कुऱ्हाडे, मच्छिंद्रनाथ बोडखे, पोलीस पाटील, चांगदेव कुऱ्हाडे, अर्जुन कुराडे, रामेश्वर कापसे, हरिभाऊ कापसे यांची उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त मेजर सुभेदार मोहन कापसे यांनी भारत हा तरुणांचा देश असून, भारतमातेला तरुणांकडून खूप अपेक्षा आहे. अग्नीवीर योजनेच्या माध्यमातून सैन्य दलात क्रांतिकारी बदल घडवून येत आहे. त्यामुळे भारतीय सैनिक हे जगातील सर्वात तरुण सैन्य बनणार आहे. त्यामुळे तरुणांनी अग्नीवीर योजनेच्या माध्यमातून सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करावे. असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के.बी.मोरे यांनी प्रास्ताविक मुख्याध्यापक सुधाकर थोरात यांनी तर आभार प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे शिक्षक विलास जाधव, शिवाजी महाजन, अनिल कुमावत, रामेश्वर शेळके, डी.पी.चिमणकर, ए.एस.शेख, सी.एच.गायकवाड, आर.एच.शिरसाट, तुकाराम शेलार, प्रतिभा नितनवरे, आनंद बोडखे, ए. एच. बिरोटे, करवरे मामा यांच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *