वाळुज महानगर (ता.26) – अंधारात आपले अस्तित्व लपवत काहीतरी दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने वडगाव – साजापूर रोडवरील सैलानी बाबा दर्गा परिसरात सोमवारी (ता.24) रोजी मध्यरात्री मिळून आल्याने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका 23 वर्षीय परप्रांतीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदन बालाराव राठोड वय 23, रा. सुतारखेडा, पोस्ट भगवानपुरा जि. खंडवा, मध्य प्रदेश (ह.मु.साजापूर) हा परप्रांतीय इसम सोमवारी (ता. 24) रोजी रात्री 11 ते मंगळवारी (ता.25) रोजी 1.00 वाजताच्या सुमारास साजापुर येथील सैलानीबाबा दर्गा समोर अंधारा मध्ये त्याचे अस्तीत्व लपवून माला विरुध्दचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपवून छपून जात असतांना मिळून आला. या प्रकरणी पोलीस अंमलदार यशवंत गोबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी चंदन राठोड यांच्या विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 122 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.