March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.10) – सकाळी उठून अंगण झाडत असतानाच दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठन हिसकावून फरार झाले. ही घटना रविवारी रोजी (ता.10) रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास सिडको वाळूज महानगरमधील जिजाऊ नगरमध्ये घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गट नंबर 170, प्लॉट नंबर 104 जिजाऊनगर सिडको वाळूज महानगर -1, येथील रिता विनोद रुद्रकार 38) ही महिला रविवारी (ता.10) रोजी सकाळी 77 वाजता घरासमोर अंगण झाडत असतांना समोरून तीन जण दुचाकीवर आले. त्यांनी रिता यांच्या गळ्यातीन दोन तोळ्याचे गंठन बळजबरीने हिसकावले पसार झाले. तिने आरडाओरड केल्याने विनोद रुद्रकर हे बाहेर आले, नागरिक जमा झाले. तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून फरार झाले होते. याप्रकरणी पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *