February 21, 2025
mete

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांचं 14 ऑगस्ट रोजी अपघाती निधन झालं. मात्र हा अपघात (Accident) नसून घातपात असावा, असा संशय काहीजणांकडून व्यक्त केला जातोय. यात विनायक मेटे यांचे सहकारी अण्णासाहेब मायकर (Annasaheb Maikar) यांचं वक्तव्य सातत्याने समोर येतंय. यापूर्वीदेखील मेटे यांचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला होता, असं वक्तव्य मायकर यांनी केलंय. आज टीव्ही9 शी संवाद साधताना त्यांनी त्या दिवसाची म्हणजेच 3 ऑगस्टची संपूर्ण घटना सांगितली. त्या दिवशीची घटना आणि प्रत्यक्ष मेटेंचा अपघात झाला, ती घटना, यात काहीतरी साम्य, काही संशयास्पद असल्याची भीती व्यक्त केलीय. मायकरांनी व्यक्त केलेल्या संशयावरून तसेच इतरही काही जणांच्या तक्रारीवरून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. यापूर्वी ज्या गाडी

त्या दिवशी काय घडलं होतं?

अण्णासाहेब मयेकर यांनी सांगितलं, 3 ऑगस्ट रोजी… मेटे यांचा अपघात होण्याच्या दहा दिवस आधी… बीडहून साडे तीन वाजता निघालो.. पुण्याजवळ रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास दोन ते अडीच किमी अंतर आमचा पाठलाग झाला. एक, दोन, तीन कट मारले. २० फुटांच्या अंतरावर एक आयशर होता. सोबत ड्रायव्हर होता. बॉडिगार्डदेखील होता. ही गोष्ट स्वतः मेटे यांनी पाहिली आहे. साहेबांच्या शेजारी मीच होतो. साहेबांनी आयशरच्या मागेच गाडी ठेवायला सांगितली. समोरच्या गाडीला पाहून साहेबांनी बरं.. बरं… असं म्हणत मान हलवली. समोरच्या गाडीत बसलेला दाढीवाला माणूस फोर व्हिलरला बघून ड्रायव्हरला हात दाखवत होता. गाडी पुढे आण म्हणत होता. पण साहेबांनी आयशरच्या मागेच गाडी ठेवायला सांगितली. नगर-पुणे रोडवर शिक्रापूरच्या जवळपास ही घटना घडली. पुण्यातला एक कार्यक्रम उरकून आम्ही मुंबईला जाऊ लागलो…

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *