मतदान यंत्रातील क्रम खालीवर झाल्याने आमचा पराभव, भाजपाच्या अनिल चोरडियांचा आरोप
वाळूजमहानगर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान यंत्रातील उमेदवारांचा क्रम खालीवर केल्याने आमच्या उमेदवारांचा पराभव झाला. असा आरोप भाजपचे अनिल चोरडिया यांनी एका पत्रकार परिषदेत केला आहे.
वडगाव (को.) – बजाजनगर ग्रामपंचायत ची निवडणुक 4 ऑगस्ट रोजी झाली. यात भाजपकडून प्रभाग दोन मध्ये अमितकुमार चोरडिया आणि वंदना गोराडे उमेदवार होते. निवडणूकीसाठी मतदान यंत्रातील कोणत्या उमेदवारांचा कोणता क्रमांक असेल. त्याचा नमुना म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी 1 आगस्ट रोजी पाठवला. त्यात भाजप महिला उमेदवार वर दोन नंबर तर पुरुष उमेदवार खाली चार नंबरला होते. त्यामुळे प्रचारादरम्यान क्रम सांगून प्रचार केला. मात्र मतदान यंत्रामध्ये महिला उमेदवार खाली तर पुरुष उमेदवार वर दिलेले होते. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा क्रमांक बदलला गेला. परिणामी आमच्या उमेदवाराचा पराभव झाला. असा आरोप भाजपचे अनिल चोरडिया यांनी केला आहे.
फोटो ओळ – पराभवाचे कारण पत्रकार परिषदेत सांगताना भाजपचे अनिल चोरडिया.