
रक्षाबंधन, बहिणींची माया अनोख्या बंधनात
आर के भराड –
वाळू
जमहानगर rknews जुळ्या मुली, त्यांना भाऊ नाही, त्यामुळे त्याच एकमेकींना भाऊ मानतात व भाऊबीजेला एकमेकींना राखी बांधतात, ओवाळतात. त्याच एकमेकींना आधार देतात, काळजी घेतात. एकमेकींचा आदरही करतात. आणि एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्याही राहतात. भाऊच पाठीराखा असतो, काळजी घेतो असे नाही बहीणही आपली रक्षणकर्ता बनू शकते. ही अनोख्या बंधनातील बहिणींची माया वाळूज परिसरात पहायला मिळते.
वाळूज औद्योगिक परिसरातील ओम साईनगर, रांजणगाव (शेणपुंजी) येथील रहिवाशी असलेल्या, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व लघु गृहउद्योग चालवणाऱ्या सविता शिंदे यांना दोन जुळ्या मुली आहेत. नशिबाने त्या 25 ऑगस्ट 1999 मधे राखी पौर्णिमेच्या दिवशी जन्माला आल्या म्हणून आई आजोबांनी त्यांचे नाव राखी आणि पौर्णिमा ठेवले. दोन जुळ्या मुली झाल्या म्हणून आईला त्या काळातही थोडेही दुःख झाले नाही. उलट आनंदच झाला. पण त्या मुलींना जन्मल्यापासून वडिलांचे सुख मिळालेच नाही. एकट्या आईने त्यांचे संगोपन केले. आज या जुळ्यामुली (बहीणी) इंजिनिअर होऊन जॉब करत आहे. आईला तर मुलाची कमतरता भासलीच नाही, परंतु त्यांनीही एकमेकींना लहान पनापासून खूप जीव लावले. त्या गेल्या दहा बारा वर्षांपासून एकमेकींना राखी बांधतात, भाऊबीजेला एकमेकींना ओवाळतात आणि गिफ्ट सुध्दा देतात. ही एक खूप समजूतदारपणाची व कौतुकास्पद बाब आहे. आज आपण फक्त म्हणतो लेक वाचवा, लेक शिकवा, पण लेक सुद्धा सर्व नाती जपवू शकते, निभावू शकते. हे या मुलींनी दाखवले. आई आणि मुलींनी हे सिद्ध केले की, एकटी महिला पण काय करू शकते. राखी फक्त भावालाच बांधली गेली पाहिजे का, नाही. आपले जे रक्षण करेल, निस्वार्थी पणे आपल्या पाठीशी खंबीर उभे राहील. मग ती व्यक्ती आई असेल, बहीण असेल त्या व्यक्तीला राखी बांधावी. हे यांच्या बारा वर्षाच्या प्रवासातून शिकायला मिळते.