
गोरगरीब जनतेवर अन्याय होत असेल, भ्रष्टाचार होत असेल तिथे मी कायदा हातात घेणार. माझ्यावर कितीही गुन्हे दाखल जाले तरी चालतील, त्याची पर्वा नाही, असं वक्तव्य हिंगोलीचे (Hingoli) आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी केलंय. हिंगोलीत कामगारांना असलेल्या मध्यान्ह भोजनाचा दर्जा निकृष्ठ असल्याचा आरोप करत संतोष बांगर यांनी उपहार गृहाच्या व्यवस्थापकाच्या (Manager) कानशीलात वाजवल्याचा प्रकार काल घडला. या घटनेची व्हिडिओ क्लिप तुफ्फान व्हायरल झाली. त्यानंतर संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडात ऐनवेळी शामिल झालेले संतोष बांगर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता हिंगोलीतील व्यवस्थापकाला कानशीलात लगावल्यामुळे त्यांच्याविरोधात जोरदार टीका होतेय. यावरून प्रतिक्रिया विचारली असता बांगर यांनी गरीब जनतेच्या हितासाठीच मी हे केल्याचं वक्तव्य केलंय.