February 22, 2025


वाळूज महानगर, ता.28 – मराठा समाजाच्या मूळअधिकाराचे भारतीय व्यवस्थेकडून होणारे हणण व चुकीच्या आरक्षण व्यवस्थेमुळे मराठा समाजाचे झालेले नुकसान यावर आवाज उठवत गंगापूर तालुक्यातील सात मराठा युवक थेट दिल्लीला पायी निघाले आहे. हे युवक सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्याच्या वतीने निवेदन देऊन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाला साकडे घालणार आहे.

दिल्लीला निघालेल्या या सात युवकांच्या वतीने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाला देण्यात येणाऱ्या निवेदनात असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. आमचा लढवय्या मराठा समाज आज रोजी भारतीय व्यवस्थेतील चुकीच्या आरक्षण पद्धतीमुळे आज तळागळाला जाऊन पोचला आहे. त्याचे कारण असे की, 1947 साली स्वतंत्र झालेल्या आमच्या भारत देशामध्ये 1952 साली प्रथम आरक्षण प्रणाली सुरू करण्यात आली. त्यावेळी आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या काही समाजास या आरक्षण प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर 1992 साली पुन्हा नव्याने काही मागासलेल्या समाजास या आरक्षण प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात आले. परंतु आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेल्या आमच्या बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजास राज्यकर्त्यांनी जाणून बुजून आरक्षणात समाविष्ट केले नाही. त्याचा परिणाम असा झाला की, आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या मराठा विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी निर्माण झाल्या. शिक्षणासाठी वडीलोपार्जित शेतजमिनी विकून मराठा तरुणांना उच्च शिक्षण घ्यावे लागत आहे. चुकीच्या आरक्षण प्रणालीमुळे मराठा तरुणांना नोकरीतही स्थान मिळत नाही. परिणामी येथील चुकीच्या आरक्षण प्रणानिला कंटाळून अल्पभुधारक झालेल्या जवळपास 18000 मराठा शेतकरी, विद्यार्थी व तरुणांनी आत्महेत्या करत आपले जीवन संपवले. व हे आत्महत्येचे सत्र आजरोजी पर्यंत असेच सुरू आहे. त्यामुळे आमचे फक्त म्हणणे नसून आमचा असा दावा आहे की, या 18000 आत्महत्या नसून महाराष्ट्र राज्यातील आतापर्यंतच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मंत्री मंडळ यांच्या चुकीच्या धोरणांनी केलेल्या हत्या आहेत. तरी आपण मराठा तरुणांच्या हत्येस जबाबदार धरून मराठा तरुणांच्या हत्येचा जाब महाराष्ट्र राज्य सरकार व भारत सरकार यांना विचारून त्यांच्यावर जागतिक पातळीवर कारवाही करावी. आणि मराठा समाजास आरक्षण देण्यास सहकार्य करावे. अशी मागणी करण्यात आली आहे. मच्छिंद्र पठाडे गंगापूर, देविदास पाठे पखोरा, रवि आढाव वाळूज, संदिप देवकर रामराई, प्रदिप निरफळ गणेशवाडी, रामेश्वर नवले गणेशवाडी, शरद ईष्टके कायगाव अशी या सात युवकांची नावे आहेत ते सर्व गंगापूर तालुक्यातील आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *