वाळूज महानगर, ता.28 – छत्रपती संभाजीनगर येथे 27 आँक्टोंबर रोजी विभागीय स्तरावर झालेल्या योग स्पर्धेत वयोगट 14 या गटात साहिल पवार इयत्ता सातवी व वयोगट 19 या गटात अविनाश चव्हाण इयत्ता नववी या विद्यार्थ्यांनी विभागीय पातळीवर यश मिळवून राज्यस्तरावर निवड निश्चित केल्याबद्दल श्री साईनाथ विद्यालय वाळूज येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मुख्याध्यापिका वंदना बेडसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येऊन विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विनोद शिंपी व राजकुमार वावरे यांचेही विद्यालयाच्या वतीने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमचे सुत्रसंचालन गुरणाळकर यांनी केले.