February 23, 2025

वाळूज महानगर, (ता.5) – एका दुचाकीवर जाणाऱ्या तीन दारुड्यांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्याने त्यांनी रस्त्यातच झुंबाझोम्बी सुरू केली. त्याचवेळी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची बस आली. आणि एका दारुड्याने बस वरच दगडफेक करून काचा फोडल्या. यात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा प्रकार बुधवारी (ता.4) रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास कोलगेट चौकात घडला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी अमोल उर्फ प्रशांत बाळकृष्ण शिवणकर (21) रा. हरीओमनगर, रांजणगाव व त्याचे कमळापूर येथील मित्र संतोष पडघन व बबलू (पूर्ण नाव माहित नाही) असे तिघेजण दारू पिऊन एका दुचाकीवर जात असताना त्यांच्यात त्यांच्यात वाद होऊन रस्त्यातच झुंबाझोम्बी सुरू झाली. त्याचवेळी रांजणगावकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी महानगरपालिकेची स्मार्ट सिटी बस (एम एच 20, ई एल-1407) आली. यावेळी दारुड्या पैकी एकाने बसवर दगडफेक करून काचा फोडून नुकसान केले. दरम्यान तिघांपैकी दोन जण फरार झाले. मात्र त्यातील प्रशांत शिवणकर हा आरोपी पकडला. त्याला तेथे जमलेल्या जमावाने बेदम चोप दिला. बुधवारी (ता.4) रोजी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास झालेल्या या सुमारास बसची समोरील काच फुटून मोठे नुकसान झाले. या प्रकरणी गणेश रामराव केजभट फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *