वाळूज महानगर, (ता.5) – बजाजनगर येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील अंडरग्राउंड मधील जमा झालेले पाणी काढण्यासाठी लावण्यात आलेला विद्युत पंप अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (ता.4) रोजी दुपारी 1.30 ते 3 वाजेच्या दरम्यान लंपास केला. ही चोरी उघडकीस येतात शाळेच्या वतीने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार देण्यात आली.