वाळूज महानगर, (ता.4) – भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने दिल्याने धडकेत लिंबे जळगाव येथील एक जण जखमी झाला. त्यास उपचारार्थ घाटीत दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी (ता.4) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास लिंबे जळगाव जवळ झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगर ते नगर हायवेवर लिंबे जळगाव येथे अपघात होऊन विलास निवृत्ती गवळी हे जखमी झाले. बुधवारी (ता.4) रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ते हॉटेलवरून घरी जात असताना लिंबे जळगाव येथील खंडोबा मंदिराजवळ अज्ञात चार चाकी गाडीने गवळी यांना धडक देऊन पसार झाली. अपघाताची माहिती कळतच जवळच असणारी श्री जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानची विनामूल्य ॲम्बुलन्स अपघातस्थळी हजर होऊन अपघातग्रस्ताला जिल्हा रुग्णालय (घाटी) येथे दाखल केले.