वाळूज महानगर, (ता.4) – पंचगंगा सोसायटीतील रस्ता हा माझ्या मालकीचा आहे. तेथील लोकांनी माझ्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. तसेच महिलांना मारहाण केली नाही. असे बिल्डर दौलतखा पठाण यांनी बुधवारी (ता.4) रोजी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेद्वारे सांगितले.
वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील पंचगंगा हाऊसिंग सोसायटीत रस्त्याच्या कारणावरून बिल्डर दौलतखा पठाण, त्यांचे नातेवाईक व सोसायटी मधील नागरीकांमध्ये सोमवारी ता.2 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास राडा झाला होता. सोसायटी मधील चार महिला जखमी झाल्या. दरम्यान महिलांना मारहाण केल्यायाप्रकरणी दौलतखा पठाण यांच्यासह चौघांवर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण गंभीर स्वरूपाचे असल्याने वाळूज परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात बिल्डर दौलतखा पठाण यांनी बुधवारी (ता.4) रोजी तात्काळ एका पत्रकार परिषदेचे आयोजन करून महिलांना मारहाण केली नाही. उलट त्याच माझ्या अंगावर धावून आल्या. मी त्यांना थांबवले, मारहाण केलेली नाही. असे म्हणत पंचगंगा सोसायटीतील नागरिकांनी माझ्या जागेवर अतिक्रमण केले आहे. घरे बांधले. यापुढे मी कायदेशीर मार्गाने लढा देईल. असे सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन्ही मुलेही होती.