लिंबेजळगाव (ता.26) :- वाळूज औद्योगिक वसाहतीत असणार्या रांजणगाव (शेपु) येथील हनुमान मंदीरात गुरुवारी (ता.1) ते 8 डिसेबर 2022 दरम्यान श्री अखंड हरिनाम सप्ताह तथा संगीत रामायण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हभप स्वामी महंत गुरुवर्य अरुणनाथगीरी महाराज (पीठाधीश, अडबंगनाथ संस्थान भामानगर,भामाठाण) यांच्या अमृत वाणीतुन सुश्राव्य संगीत रामायण कथा भाविकांना दररोज सायंकाळी 6 ते 8 श्रवण करता येईल. सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगीरीजी महाराज यांचा कृपा आशिर्वाद मिळालेले अरुणनाथगीरी महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतुन रामकथा श्रवणाचा भाविकांना लाभ घेता येईल. परीसरातील भाविकांनी या ज्ञानयज्ञ सोहळयाचा लाभ घेण्याचे आवाहन सप्ताह समितीसह नागरीकांनी केले आहे.