वाळूजमहानगर (ता.21) – सिडको ग्रोथ सेंटर, वाळूज महानगर 1 येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये बाल दिनानिमित्त आनंद नगरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित कॅन्टीन डे ची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली. या आनंदनगरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्टॉल लावून विविध पदार्थ विक्रीच्या माध्यमातून व्यावहारिक ज्ञान मिळवले.
यावेळी संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ तयार विक्रीसाठी ठेवले होते. प्रत्येक पदार्थाच्या स्टॉलवर उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत होता. विशेष म्हणजे या आनंदनगरी मधील सर्व स्टॉल वरील चविष्ट पदार्थ घरी तयार केलेले होते. या अशा कार्यक्रमातून मुलांना आनंद तर मिळतोच. सोबत व्यवहार ज्ञान ची माहिती कळते. यावेळी शिक्षिका सोनाली कुलकर्णी, अर्चना जगताप, रूपाली उपळकर, राणी कांबळे, केतकी लिपणे, सई राणे, सरिता डावखर, वंदना कदम, सुवर्णा जोशी, मधुश्री डाके, सुवर्णा कदम, मयुरी पवार, रूपाली चौधरी, विना कन्नावार यांनी परिश्रम घेतले.