February 24, 2025

वाळूजमहानगर (ता.21) – अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो 2023 मध्ये एकूण 590 पेक्षा जास्त स्टॉलस् असून सर्व प्रकारच्या अद्ययावत तसेच आंतरराष्ट्रीय स्तराची सुविधा देण्यात येणार आहे. महाराष्ट्र तसेच इतर राज्यातून नामांकित उद्योगांनी आपला सहभाग नोंदवला आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उद्योगांनी देखील या प्रदर्शनाला भेट द्यावी. यासाठी संघटना प्रयत्न करत असून, प्रदर्शनाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, तसेच इंडस्ट्रीसाठी उत्तम ग्राहक मिळवणे हा प्रमुख उद्देश आहे. या प्रदर्शनात विविध कार्यशाळा, परिसंवाद देखील आयोजित केले जाणार असल्याचे अध्यक्ष किरण जगताप यांनी सांगितले.

दर तीन वर्षांनी प्रदर्शन
औरंगाबाद येथील लघु उद्योजकांना नवनवीन संधि उपलब्ध व्हाव्यात तसेच नविन उत्पादने तसेच तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. यासाठी मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (मसिआ) संघटना दर तीन वर्षांनी अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो’ हे औद्योगिक प्रदर्शन आयोजित करत असते. यावेळी 5 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान हे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. त्यासाठी अध्यक्ष किरण जगताप, कनव्हेनर अभय हंचनाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारिणी सदस्य आणि सभासद यांच्या सहकार्याने जोमाने तयारी सुरू आहे.

प्रदर्शनाला यशस्वी परंपरा –
मसिआच्या औद्योगिक प्रदर्शनाला एक यशस्वी परंपरा लाभलेली आहे. आतापर्यंत मसिआने 2002, 2005, 2010, 2011, 2014, 2017 आणि 2020 मध्ये आयोजित केलेले प्रदर्शन यशस्वी झालेले आहेत. यामध्ये अनेक नामांकित कंपन्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. या प्रदर्शनात मोठ्या संख्येने गुंतवणूकदार, प्रदर्शक आणि दर्शक भेट देतात. अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो च्या माध्यमातून गुंतवणुकीसाठीही फायदा होणार असून, मराठवाडा आणि औरंगाबाद औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रमोट करण्याचा प्रयत्न आहे. आत्तापर्यंत झालेल्या प्रदर्शनातून उत्तम व्यवसाय आणि अनेक कोटींची उलाढाल तसेच प्रदर्शनात आलेले प्रदर्शक, उद्योगासाठीच्या चौकशी आणि भेट देणाऱ्याची आकडेवारी वाढतच गेलेली असल्याचे कनव्हेनर अभय हंचनाळ यांनी सांगितले.

नव्वद टक्के स्टॉल बुक
सर्व कार्यकारिणी सदस्य, सभासद यांच्या अथक परिश्रमातून आतापर्यंत 90 टक्के स्टॉल बुक झाले आहेत. अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो म्हणजे आपल्या उद्योगाला नविन भरारी देण्याची सुवर्णसंधी असणार आहे, त्यामुळे मसिआ संघटनेच्या सर्व सभासदांनी स्टॉल बुक करावा असे आवाहन यावेळी अध्यक्ष किरण जगताप यांनी केले. अधिक माहितीसाठी मसिआच्या मुख्य कार्यालय चिकलठाणा किंवा वाळूज येथील कार्यालयास भेट देवून अधिक माहिती घ्यावी. असे आवाहन अध्यक्ष किरण जगताप, कनव्हेनर अभय हंचनाळ व सर्व कार्यकरणी सदस्यांनी केले आहे.

हे औद्योगिक प्रदर्शन डीएमआयसी शेंद्रा येथे होणार असून, प्रत्यक्ष नियोजित जागेच्या सफाई आणि लेव्हल करण्याच्या कामाला अँरिक सिटी तर्फे अधिकारी दीपक मुळीकर, महेश शिंदे पाटील, अनिल पाटणी यांच्या हस्ते पूजा करून सुरुवात करण्यात आली. यावेळी मसिआचे अध्यक्ष किरण जगताप, अॅडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो 2023 चे कनव्हेनर अभय हंचनाळ, उपाध्यक्ष अनिल पाटील, भगवान राऊत, सचिव राहुल मोगले, राजेंद्र चौधरी, सहसचिव अभिषेक मोदाणी, सुदीप अडतीया, कोषाध्यक्ष सुरेश खिल्लारे, प्रल्हाद गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख दुष्यंत आठवले, रवि आहेर, उद्योग संवादचे संपादक श्रीराम शिंदे, सहसंपादक सर्जेराव साळुंके, कार्यकारिणी सदस्य सर्व अर्जुन गायकवाड, गजानन देशमुख, मनीष अग्रवाल, कमलाकर पाटील, शरद चोपडे, चेतन राऊत, हरिश्चंद्र पठाडे, रोहन येवले, राजेंद्र हुंडेकर, श्रीकांत सूर्यवंशी यांच्यासह सदस्य भीमराव कडावकर, दिलीप चौधरी, संदीप जोशी, रोहित नाईकवाडे उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख दुष्यंत आठवले व सह प्रसिद्धी प्रमुख रवि आहेर यांनी सांगितले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *