वाळूजमहानगर (ता.20) – वाळूज येथील इंटरनॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट (आयसीम) तर्फे पुुल कँपस कम जाॅब फेअरचं आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी पाचशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी करुन उदंड प्रतीसाद दिला. या कँपसच्या माध्यमातून सुमारे दोनशे विद्यार्थ्यांचे प्राथमिक चाचणीद्वारे परीक्षण झाले व पुढील आठ दिवसात त्यांची अंतीम निवड यादी प्रसिद्ध केल्या जाईल. असे आयसीम कॉलेजच्या वतीने सांगण्यात आले.
या कँपससाठी विविध क्षेत्रातील वीस पेक्षा जास्त कंपन्याचा सहभाग होता. यात मायक्राॅनीक्स, बायजूस, टि.व्ही.एस. फायनान्स, व्हीम स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी, आय.जी.टी.आर, मिडिया इंडिया प्रा. लि., धुत ट्रान्समिशन, इन्फीनीटी, ऐमफासीस लि., फीटवेल मोबीलीटी प्रा. लि., बजाज सेल्स लि., स्कायरूट्स व्हेन्चर्स, आय.जी.बी. फिनकाॅन, बिझप्लेअर्स मार्केटिंग, मॅन युनायटेड एच आर अँड मार्केटिंग, यशस्वी ग्रुप, डेक्कन एज्युकेशन, आदी कंपन्यांचा सहभाग होता.
टि.पी.ओ. युसूफ खान, डाॅ. समीर जोशी, शिवम गावंडे, भास्कर अभंग, समीना खान, निलेश कल्याणकर, जयवंत राठोड यांनी कँपस यशस्वी करण्यासाठी विशेष परीश्रम घेतले.
आयसीमचे अध्यक्ष डाॅ.सुभाष झवर, उपाध्यक्ष रमाकांत पुलकुंडवार, सचिव दिलीप सारडा, संचालक डाॅ. चंद्रप्रकाश पद्मावत, डाॅ. आर. एस. जहागिरदार, डाॅ. गौतम शहा, उपप्राचार्य हेमंत जाधव, एमबीए हेड डाॅ. दिपमाला बिरादार, काॅम्पूटर हेड आनंद हुंबे, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स हेड सायली राठोड, सिव्हिल हेड विनोद शिखरे, मेकॅनिकल हेड शिवराम जंजाळ व सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.