February 23, 2025

वाळूजमहानगर (ता.8) :- ज्या राज्यात अनेक घोटाळे होतात, तरीही मंत्र्यांना माफ केले जाते. 14 हजार पदे रिक्त असतानाही पोलीस भरती केल्या जात नाही, रोजगारासाठी तरुण रस्त्यावर फिरत असताना उद्योग राज्याबाहेर जातात, उद्योग मंत्र्यांना त्याबाबत काडीची ही माहिती नाही. असे राज्यकर्ते कुठे नेऊन ठेवणार आहे महाराष्ट्र, असा प्रश्न मला पडला आहे. असे राज्यकर्ते तुम्हाला मान्य आहेत का? असे सत्ताधारी तुम्हाला मान्य आहेत का? स्वतःला खोके आणि जनतेला धोके देणाऱ्या या सरकारला विचारा रोजगार देता की जाता? असे आवाहन युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बजाजनगर येथे मंगळवारी (ता.8) रोजी जनआक्रोश मेळाव्यात केले. 

 

राज्य सरकारकडून राज्याबाहेर पाठविण्यात येणारे उद्योग, शेतमालाच्या नुकसानीमुळे व रखडलेल्या पंचनामे अभावी शेतकऱ्यांची होणारी हेळसांड तसेच अतिवृष्टी, दुष्काळी परिस्थिती आढावा घेण्यासाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांनी बजाजनगर येथे जन आक्रोश मेळावा झाला. प्रथम युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे मंगळवारी (ता.8) रोजी क्रांतीचौकातून भव्य वाहन रॅलीने बजाजनगर येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात आयोजित जनआक्रोश मेळाव्यात शिंदे -फडणवीस सरकारचा खरपूस समाचार घेतला. व्यासपीठावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, आमदार उदयसिंग राजपूत, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, जिल्हा प्रमुख किशनचंद तनवाणी, माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवा सेना उपसचिव ऋषिकेश खैरे, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, भारतीय कामगार सेनेचे चिटणीस प्रभाकर मतेपाटील, युवा सेनेचे हनुमान शिंदे, मच्छिंद्र देवकर, उपजिल्हाप्रमुख बाप्पा दळवी, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, उद्योजक कैलास भोकरे, वडगाव (को)- बजाजनगरचे माजी सरपंच सचिन गरड, ग्रामपंचायत सदस्या मंदा भोकरे, कमलबाई गरड, विजय सरकटे, काकासाहेब जीवरक, दत्तात्रेय वर्पे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *