वाळुज महानगर (ता.4):- तुर्काबाद गटाअंतर्गत येणाऱ्या येसगाव (दिघी) येथे महाराष्ट्र बँकेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी एका कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी (ता.5 रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमात बँकेच्या विविध उपक्रमाची माहितीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
येसगाव येथील मारोती मंदिरासमोर शनिवारी (ता.5 रोजी सकाळी 9 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून येथील गावकऱ्यांना ही एक खुश खबर आहे. ज्यांना महाराष्ट्र बँकेत 0 बॅलन्स मध्ये मोफत बँक खाते उघडायचे असेल, त्यांनी आधार कार्ड झेरॉक्स आणि पासपोर्ट फोटो सोबत घेऊन यावे. या कार्यक्रमात महाराष्ट्र बँकेचे सर्व अधिकारी, ग्रामसेवक सरपंच उपस्थित राहणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना कर्जाबाबत आणि महिला बचतगट, पुरुष बचतगट, शेतकरी गट, सुशिक्षित बेरोजगार, मुद्रालोन कर्ज वाटपाबाबत बँके चे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी, महिलांनी, तरुणांनी मंदिरासमोर येऊन कार्यक्रमास उपस्थित राहावे. असे अवाहन महाराष्ट्र बँकेच्या वतीने करण्यात आले आहे. अशी माहिती भराड पाटील येसगावकर यांनी दिली आहे.