वाळूजमहानगर – मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर (मसिआ) च्या मुख्य कार्याल, चिकलठाणा येथील जागेत मसिआच्या उद्योजक सभासदांच्या सहकार्याने उभारलेल्या भव्य आणि अद्ययावत सुविधांनी युक्त असेलल्या सभागृहाचे ‘श्रीमती रत्नप्रभा बाळासाहेब पवार सभागृह’ असे नामकरण करण्यात आले. या सभागृहाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.21) ऑक्टोबर 2022 रोजी झाले.
या कार्यक्रमास रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे, बहुजन व इतर मागासवर्ग, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरणारे, एमएसीसीएचे माजी अध्यक्ष मानसिंग पवार, आणि मसिआचे अध्यक्ष किरण जगताप यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. यावेळी सभागृहाला विशेष स्वरूपात आर्थिक देणगी देणारे मे, रत्नप्रभा मोटर्सचे संचालक मानसिंग पवार आणि कुटुंबीयांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.
मसिआ अध्यक्ष किरण जगताप –
यावेळी अध्यक्षीय भाषणात किरण जगताप यांनी मसिआने औद्योगिक क्षेत्रातील संघटनेच्या या इमारतीचा आणि सभागृहाचा औद्योगिक उपक्रमांसाठी वापर केला जाणार असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी चिकलठाणा एमआयडीसी अंतर्गत रस्ते दुरुस्त करावे, वाळूज औद्योगिक क्षेत्रातील गट नंबर मधील उद्योगांना मूलभूत सुविधा आणि सबसिडी द्यावी, कौशल्य विकास केंद्रासाठी इनक्यूबेशन सेंटर स्थापन करावे, येथील रोजगार निर्मिती आणि लघु उद्योग वाढीसाठी मराठवाड्यात मोठी गुंतवणूक आणावी आदी मागण्या केल्या.
संचालक मानसिंग पवार –
मे. रत्नप्रभा मोटर्सचे संचालक मानसिंग पवार यावेळी बोलताना म्हणाले की, आज आईवडिलांच्या ऋणातून काही प्रमाणात का होईना उतराई होण्याची संधी मला मसिआ संघटनेच्या या सभागृहाला नाव दिल्यामुळे मिळाली. लघु उद्योजकांसाठी मसिआने आजपर्यंत अनेक चांगली कामे केली आहेत. त्यामुळे या सभागृहासाठी नाव देण्याचा प्रस्ताव ज्यावेळी आला. त्यावेळी त्या प्रस्तावाला मी लगेच होकार दिला. कारण या संस्थेचे कार्य खूप मोलाचे असून यामागे अनेक लघु उद्योजकांचे परिश्रम आणि त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेली तळमळ आदर्श निर्माण करते असे मत मांडले. तसेच अध्यक्ष किरण जगताप यांनी मांडलेल्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्या. अशी मागणी देखील यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे श्री मानसिंग पवार यांनी केली.
सहकार मंत्री अतुल सावे –
यावेळी अतुल सावे यांनी मनोगत व्यक्त करताना वाळूज औद्योगिक क्षेत्रात उद्योग वाढीसाठी जागा नसल्यामुळे अतिरिक्त वाळूज एमआयडीसी करावी. अशी मागणी केली. उद्योजकांच्या सबसिडी साठी प्रयत्न करावे, तसेच शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात कोनव्हेन्शन सेंटर उभारावे.
पालकमंत्री संदिपान भूमरे –
संदिपान भूमरे यांनी मनोगत व्यक्त करताना पालकमंत्री म्हणून उद्योजक यांच्यासाठी मी सदैव उभा असेल व येथील उद्योजकांचे व किरण जगताप यांनी मांडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील मदत करेल असे आश्वासन दिले.
उद्योगमंत्री उदय सामंत –
यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मसिआ या औद्योगिक संघटनेने एवढ्या मोठ्या व सर्व अद्ययावत सोईसुविधांनी युक्त असलेल्या सभागृहाचे काम केल्याचे पाहून आनंद व्यक्त केला. आणि हे सभागृह महाराष्ट्रात एकमेव तयार झाल्याचे सांगून समाधान व्यक्त करून प्रशंसा केली.
यावेळी मसिआ अध्यक्ष किरण जगताप यांनी जे प्रश्न मांडले ते नक्कीच सोडविले जातील. असे आश्वासन सर्वांना दिले. तसेच चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील रस्ते विकसित करण्याकरिता लवकरच निधी उपलब्ध केल्या जाईल व तो फक्त औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठीच वापरला जाईल. असे देखील आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी आणि एमआयडीसीचे पदाधिकारी यांना देखील तशा सूचना यावेळी उदय सामंत यांनी दिल्या.
प्रमुख उपस्थिती –
या कार्यक्रमास एमआयडीसी, महानगर पालिका तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी यांच्यासह मसिआचे माजी अध्यक्ष केशव पारटकर, पृथ्वीराज शहा, अर्जुन गायके, संतोष चौधरी, अनुप काबरा, प्रितिश चटर्जी, अशोक काळे, सुनील भोसले, भारत मोतींगे, बालाजी शिंदे, विजय लेकुरवाळे, सुनील कीर्दक. नारायण पवार, अभय हंचनाळ यांची उपस्थिती होती. तसेच पदाधिकारी व कार्यकरिणी सदस्य अनिल पाटील, भगवान राऊत, राहुल मोगले, राजेंद्र चौधरी, सुदीप अडतीया, अभिषेक मोदाणी, प्रल्हाद गायकवाड, सुरेश खिल्लारे, दुष्यंत आठवले, रवी आहेर, श्रीराम शिंदे, सर्जेराव साळुंके, मनीष अग्रवाल, चेतन राऊत, गजानन देशमुख, सचिन गायके, राजेश मानधनी, अजय गांधी, कुंदन रेड्डी, श्रीकांत सूर्यवंशी, सलिल पेंडसे, आनंद पाटील, कमलाकर पाटील, नितीन तोष्णीवाल, राजेश हुंडेकर, सी जी, आगलावे, श्रीधर नवघरे, नामदेव खराडे, दिगंबर मुळे, संजय काकडे, राहुल घोगरे, रत्नप्रभा शिंदे, आरती पारगावकर, सारिका कीर्दक, प्रियंका वाबळे, ऋतुजा जगताप यांच्यासह एकूण 275 उद्योजकांची यावेळी उपस्थिती होती. असे मसिआचे प्रसिद्धी प्रमुख दुष्यंत आठवले व सहप्रसिद्धी प्रमुख रवी आहेर यांनी सांगितले.