वाळूजमहानगर – रांजणगाव (शेणपुंजी) येथील श्री गजानन विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी दीपावली सणाचे औचित्य साधून पर्यावरण पूरक आकाशकंदील व विविध रंगी पणत्या तयार करून प्रदर्शन भरलले. हेच आकाशकंदील व पणत्या दिवाळीत घरी वापरण्याचा संकल्प केला. श्री गजानन विद्या मंदिरच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
रांजणगाव येथील चिऊ काऊ बालसंस्कार मंडळ संचलित श्री गजानन प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिर, बसवंतराव पाटील प्राथमिक व माध्यमिक इंग्लिश स्कूल, श्री गजानन ज्युनिअर कॉलेज रांजणगाव येथे शाळेचे सचिव हरीश जाधव यांच्या संकल्पनेतून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी व्हायला हवी. यामध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता विकसित व्हावी. यासाठी शाळेमध्ये शिशुवर्ग पासून 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त आकर्षक आकाश कंदील व विविध रंगी व विविध आकाराच्या पणत्या बनविल्या. सुंदर व कल्पकतेने वेगवेगळ्या टाकाऊ वस्तूचां व क्राफ्टपेपरचा वापर करून विद्यार्थ्यांनी दिवाळीत वापरण्याच्या पर्यावरणपूरक वस्तू बनवल्या. तर काही विद्यार्थ्यांनी बाजारातून खरेदी केल्या. संस्थेचे अध्यक्ष आय जी जाधव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुरेखा बस्वदे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एम व्ही शिनगारे, मीरा देशपांडे, बसवंतराव पाटील इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा बिदरकर, माध्यमिक विभाग बी व्ही शिरसाठ यांनी आकाश कंदीलची पाहणी करून विद्यार्थ्यांना कौतुकाची शाबासकीची थाप दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी असेच आकाश कंदील घरी वापरण्याचा संकल्प केला. या प्रसंगी प्रा संजय तुपे, हनुमान जाधव, नरवडे मिस, बिंदू प्रजापती, निलिमा रेलेकर, पूजा गिरी, दीपक कोळी, दीपक पठारे, शहाजी मंगनाळे, विशाल जाधव, संदीप हिंगणकर, अशोक तारडे, कल्याण कुलकर्णी आदी शिक्षकांनी मेहनत घेतली.