वाळूजमहानगर – सिडको ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये दिवाळी निमित्त रांगोळी व आकाश कंदील यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या हाताने सजवलेले दिवे आणि आकाश कंदील आणले होते. तसेच आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. हे सजवलेले आकाश कंदील आणि दिव्यांच्या रोषणाईमध्ये शाळा उजळून निघाली होती. संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा म्हस्के, श्रद्धा म्हस्के यांची उपस्थिती होती.
सर्व शिक्षकांनी मिळून शाळेच्या पटांगणापासून सर्व वर्गांपर्यंत सुंदर आणि सुबक अशा रांगोळी काढल्या होत्या. त्यामध्ये समाजाला सुंदर असा संदेश मिळेल अशी ऑनलाइन शाळा आणि ऑफलाइन शाळा यातील फरक दर्शविण्यात आला होता. दुसरी रांगोळी म्हणजे श्री लक्ष्मी देवीची ही रांगोळी विविध अशा कडधान्य आणि धान्यापासून बनवलेली होती. या रांगोळीसाठी तांदूळ -20 किलो, मुगडाळ- 2 किलो, मुग-1 किलो, कारळे-1 किलो, राळे -1 किलो, साबुदाणा – 1 किलो, जवस-1 किलो. असे साहित्य लागले. 5 ×10 आकाराची ही रांगोळी काढण्यासाठी 15 तास वेळ लागला. श्रद्धा म्हस्के, सोनाली कुलकर्णी, मोनिका चतुर्भुज, अर्चना जगताप, रूपाली उपळकर, राणी कांबळे, केतकी लीपने, सरला रोडगे, सई राणे यांनी परिश्रम घेतले.
तिसरी रांगोळी विविध फुलांची यामध्ये वापरण्यात आलेली फुले झेंडू -20 किलो, शेवंती -15 किलो, गुलाब -300, मोगरा -10 किलो. तीन तास वेळ लागलेल्या या रांगोळीसाठी सरिता डावखर, वंदना कदम, सुवर्णा जोशी, मधुश्री डाके, सुवर्णा कदम, मयुरी पवार, रूपाली चौधरी, विना कन्नावार यांनी सहकार्य केले. यासाठी संचालिका निर्मला म्हस्के यांचे मार्गदर्शन मिळाले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होता. या आपल्या पारंपरिक सणाची सजावट पाहून पालकांकडून छान अभिप्राय मिळाले.