धरमपूर येथील जागृत तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या माता पद्मावती देवीची पायी पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भक्तांनी माता पद्मावतीच्या चरणी साडी, चोळी अर्पण केली. सहवाद्य काढण्यात आलेली ही मिरवणूक अत्यंत उत्साहात पार पडली.
ग्रामदैवत हनुमान मंदिरपासून ही मिरवणूक सुरु झाली. संपूर्ण गावातुन माता पद्मावती मंदिरापर्यत ही मिरवणूक काढण्यात आली. यात धरमपूर, बजाजनगर, राजस्थान, गुजरात, नासिक, छत्रपती संभाजीनगर, नगर येथील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यात्रेदरम्यान धरमपूर गावातील नागरिकांनी यात्रेचे ठिकठिकाणी स्वागत केले. माता पद्मावतीचे पूजन करून खण,नारळ, साडी, चोळीने ओटी भरली. मिरवणूकी नंतर पद्मावती माता मंदिर सेवा समितीच्या वतीने कॅप्टन रुचिका जैन यांनी भाविकांना माता पद्मावती देवीच्या महात्म्याबद्दल माहिती सांगितली.
यावेळी मंदिर सेवा समितीच्या संस्थापक अध्यक्षा कॅप्टन रुचिका जैन यांनी सपरिवार महाआरती केली व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली.