वाळूजमहानगर – वडगाव (को.) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत माता पालकांचा मेळावा सोमवारी (ता.10) रोजी आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास शंभरावर माता भगिनींनी उपस्थित राहून विविध प्रकारच्या उपक्रमात सहभाग नोंदवला.
यावेळी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, मंगल गाडेकर, माता पालक संघाच्या नवनिर्वाचित अध्यक्ष मुक्ता केंद्रे, उपाध्यक्ष सीता डोंगरे यांनी महिलांचे आरोग्य व आहार, मातापालक संघाचे कार्य, मुलींच्या भावविश्वाचा आणि करिअरचा समन्वय या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास हरिश्चंद्र रामटेके, सचिन वाघ, अनिता राठोड यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन, सूत्रसंचलन विद्या सोनोने यांनी केले तर आभार सोनाली निकम यांनी मानले. यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये प्रतिभा इंगळे, सुमन पुंडगे, पद्मा राठोड, सविता राठोड यांनी बक्षिसे पटकावली.