वाळूजमहानगर – आपल्या अंगी असलेली बौद्धिक संपदा व आपल्या हक्काचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी वाळुज येथील आयसीएम कॉलेजमध्ये केले. ते विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करीत होते.
‘नॅशनल आय.पी. अवेअरनेस मीशन’ अंतर्गत वाळूज येथील आयसीम इंजिनियरिंग व एमबीए महाविद्यालयात ‘इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स’ म्हणजे ‘बौद्धीक संपदा हक्क’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी भारतीय पेटेंट ऑफीसचे अमोल पाटील यांनी काॅपीराईट, ट्रेडमार्क व पेटेंटींग, नोंदणी प्रक्रिया याबद्दल सखोल मार्गदर्शन केले.कार्यक्रमास शिवाजीदादा बनकर, गणेश बनकर उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी आयसीमचे अध्यक्ष डाॅ.सुभाष झवर, उपाध्यक्ष रमाकांत पुलकुंडवार व सचिव दिलीप सारडा, संचालक डाॅ. चंद्रप्रकाश पद्मावत, उपप्राचार्य हेमंत जाधव, प्रा.आनंद हुंबे, डाॅ. समीर जोशी, डाॅ. दीपमाला बिरादार, प्रा. विनोद शिखरे, प्रा. शिवराम जंजाळ, प्रा. सायली राठोड, शिक्षक व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.