वाळूजमहानगर – बजाजनगर येथील बीजीपीएसच्या औरंगाबाद पब्लिक स्कूल येथे क्रिडा सप्ताहानिमित्त संपूर्ण सप्ताहामध्ये विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले. त्यामधील विजेत्या खेळाडूंना अंतिम फेरीत खेळण्यासाठी प्रवेश देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ अधिकारी, आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक, राष्ट्रीय पंच, कुक्कीवॉन, कोरिया येथील ब्लॅक बेल्ट, प्रेरक प्रशिक्षक सेल्फ डिफेन्स ट्रेनर असे प्रख्यात गजेंद्र वैजिनाथ गावंदर यांची उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे संयुक्त संस्थापक अध्यक्ष अमन जाधव हे सुध्दा प्रामुख्याने उपस्थित राहिले. तसेच राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्या विमल जाधव, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी बी बी जाधव हे कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला शर्मा यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली. सुत्रसंचालनाची धुरा वैश्नवी मगर आणि नीर ठोले या विद्यार्थ्यांनी सांभाळली. त्यानंतर विविध खेळातील स्पर्धकांनी आपआपल्या प्रतिस्पर्धींना तोडीस तोड असे उत्तर दिले. त्यामुळे स्पर्धा अतिशय रंगतदार झाली. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांचा उत्साह वाढविला. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य, कास्य पदक, चषक, सन्मानपत्र, देऊन सन्मानित करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनपर भाषण दिले. त्यामध्ये खेळ हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे व त्यामुळे आनंद उत्साह निर्माण होतो असे सांगण्यात आले. शेवटी संस्कृती पवार या विद्यार्थ्यांनीने आभार मानले.