February 23, 2025

वाळूजमहानगर – नशेत तर्रर असलेला एक अनोळखी नशेखोर घरात घुसला आणि तेथेच पडला. काही केल्या तो घरातून बाहेर निघेना. त्यामुळे महिलेने आरडाओरड केली असता मदतीसाठी धावून आलेल्या नागरिकांनी त्याला बेदम चोपला. मात्र काही दक्ष नागरिक व पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. ही माँब ब्लिचिंगची घटना बजाजनगर येथे बुधवारी (ता.5) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

बजाजनगर येथील जयभवानी चौक ज्ञानेश्वर गवारे यांच्या घरात महिलेची वेशभूषा तसेच चेहऱ्याला ‘ स्कार्फ बांधून एक नशेखोर तरुण पाणी पिण्याच्या बहाण्याने शिरला. त्यांनी त्याला पाणी दिले. मात्र नशेत तर्रर असल्याने चक्कर तो घरातील पलंगावर जाऊन पडला. काही केल्यानेही तो बाहेर जात नसल्यामुळे गवारे कुटुंबीयांनी आरडाओरड केली. त्यामुळे नागरिक मदतीसाठी धावून आले. नशेत असलेला व महिलेच्या वेषात असलेला तो तरुण घराबाहेर निघेना. शिवाय तो उलट-सुलट उत्तरे देत असल्याने संशय बळावला. आणि नागरिकांनी त्यास घराबाहेर काढले व बेदम चोपले. मात्र काही दक्ष नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिल्याने पोलीस अंमलदार दीपक मते, देवबोने यांनी धाव घेत त्याची सुटका केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. बजाजनगर येथे बुधवारी (ता.5) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या या मॉब ब्लिचिंगच्या घटनेत जखमी झालेला तरुण तृतीय पंथी असून त्याचे नाव अतुल देवराज दुबे (वय 22) , रा. रांजणगाव (शेणपुंजी) असे असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यास उपचारार्थ घाटीत दाखल केले.

कायदा हातात घेऊ नये –
दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नये, असा प्रकार आढळून आल्यास खात्री केल्याशिवाय नागरिकांनी कोणालाही मारहाण करणे हा सुद्धा गुन्हा आहे. कोणालाही असा प्रकार आढळून आल्यास प्रथम पोलिसांना खबर करावी.
नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये. असे आवाहन वाळुज एमआयडीसी ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी करण्यात आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *