वाळूजमहानगर – हे सरकार कामगार, शेतकऱ्यांवर अन्याय, बेरोजगारांना वंचित ठेवणारे असून फाँक्सका़न, वेदांता प्रकल्प बाहेर नेल्यामुळे 2 लाख युवकांना रोजगाराची संधी हूकली.
जे सत्तेवर आहेत त्यांना वाकवण्याची ताकत सेनेत आहे.
असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जोगेश्वरी येथे केले.
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्याबद्दल अंबादास दानवे यांचा जोगेश्वरी येथे शनिवारी (ता.1) रोजी भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी जागोजागी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करुन सत्कार केला. याप्रसंगी असंख्य कार्यकर्त्यांचे शिवसेनेत पक्षप्रवेश केला. त्यांचे स्वागतही दानवे यांनी केले. यावेळी उपस्थितांना संवाद साधताना दानवे पुढे म्हणाले की, शेतकरी, सामान्य कार्यकर्ते शिवसेनेत विश्वासाने प्रवेश करायला लागलेत, शिवसेना ही संघटन, चळवळ, संस्कृती, प्राण, अस्मिता आहे. संघर्ष कराल तेवढे अभूतपूर्व यश मिळेल. महाराष्ट्राला विकणारे लोक तयार झाले आहेत, त्यांना संपवण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी विविध विकास कामांचे भूमीपूजन व जोगेश्वरीचे उपसरपंच प्रविण दुबिले यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे ऊद्घाटनही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. कार्यक्रमास उपजिल्हाप्रमुख कृष्णा डोनगावकर, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, विभागप्रमुख कैलास हिवाळे, सरपंच अमोल लोहकरे, संपत छाचेड, भारतीय कामगार सेनेचे प्रभाकर मते यांच्यासह शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.