वाळूजमहानगर – बजाजनगर येथील एस. टी. कॉलनीतील तुळजाभवानी मंदिर परिसरात श्री आई तुळजाभवानी नवरात्र उत्सव समितीच्या वतीने रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलभैय्या चोरडिया व जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई चोरडिया यांच्या हस्ते तुळजाभवानी मातेची व हनुमंत रायाची महाआरती करण्यात आली.
यावेळी पंचायत समिती सदस्य सतिष पाटील, ग्रामपंचायत सदस्य माया पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अमित चोरडिया, सुमित चोरडिया, रविंद्र म्हस्के यांची उपस्थिती होती. नवरात्र उत्सवानिमित्त रास दांडियाचे आयोजन करण्यात आले असून यास मोठा प्रतिसाद मिळत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात परिसरातील महिला दररोज वेगवेगळ्या रंगाच्या साड्या व मुली ड्रेस घालून देवीचा जागर करत आहे. यात विविध धार्मिक कार्यक्रमासह रास दांडियाही रंगत आहेत. विविध गाण्यावर महिला दांडिया नृत्य करून कार्यक्रमात रंगत भरत आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष दिपक सावळे, उपाध्यक्ष नारायण सोगे, सचिव प्रविण कवठेकर, कोषाध्यक्ष सुरेश घोरपडे, कार्याध्यक्ष सुनिता सोनवणे, सहसचिव नारायण म्हस्के, सहकोषाध्यक्ष रविंद्र ताजणे, सदस्य बाबासाहेब लिपणे, जोसेफ सोनवणे, अशोक बागुल, शिवलिंग पटने व परिसरातील नागरिक, माता भगिनी प्रयत्न करीत आहे.