वाळूज महानगर – शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्व स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मार्गदर्शनपर आवाहन अध्यक्षीय भाषणात शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी वाळूज परिसरातील हायटेक महाविद्यालय बजाजनगर येथे 27 सप्टेंबर रोजी झालेल्या केंद्रप्रमुख, जिल्हा परिषद सर्व शाळा मुख्याध्यापक यांच्या सहविचार बैठकीत केले. यावेळी त्यांनी जि प प्रा शाळा गाजरमळा या शाळेचे विशेष कौतुकही केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद औरंगाबाद प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, उपशिक्षणाधिकारी साबळे, सहायक कार्यक्रम अधिकारी समग्र शिक्षा, डॉ सोज्वल जैन, गटशिक्षणाधिकारी समाधान आरख, अनिलकुमार सखदेव, अरविंद कापसे, विद्या दीक्षित, राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. कादरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी साळवे यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र व सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन विषयावर तर सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ सोज्वल जैन यांनी वन्य जीवन मंडळ व खगोल शास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच शैक्षणिक गुणवत्ता विकास अंतर्गत महत्वाच्या प्रशासकीय विषयावर गटशिक्षणाधिकारी समाधान आरख, शिक्षणाविस्ताधिकारी अनिलकुमार सकदेव, अरविंद कापसे, विद्या दिक्षित यांनी मार्गदर्शन केले. त्या नंतर सध्यस्थीती केंद्र/शाळा स्तर शैक्षणिक गुणवत्ता विकास अंमलबजावणी निपुण भारत अभियान, विविध शिष्यवृत्ती, समावेशीत शिक्षण उपक्रम या विषयावर विलास गायकवाड, रामकीशन पांचाळ, मनोज भुताळे व दातत्र्यय घोगरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज भुताळे यांनी तर आभार नारायण भुजाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोपट रहिवले, गणेश गवांदे, देवीदास सूर्यवंशी आणि साधन व्यक्ती, विशेष शिक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.