वाळूजमहानगर – पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय वकृत्व व कथाकथन स्पर्धेत रांजणगाव (पोळ) येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर माध्यमिक विद्यालयातील आठवीचा विद्यार्थी कार्तिक किसन कुऱ्हाडे याने तृतीय क्रमांक मिळवला. जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ डॉ.रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते विद्यार्थी कार्तिक व शिक्षक प्रतिनिधी संतोष मल्लनाथ, सहशिक्षक रामेश्वर शेळके यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये राज्यभरातील विविध शाळेतील हजारो विद्यार्थ्यांसह रांजणगाव येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर महाविद्यालयाचे 24 विद्यार्थी सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते त्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे संचालक प्रदीप लोखंडे, डॉ विजय भटकर, डॉ जब्बार पटेल, डॉ.नौशाद फोर्ब्स, डॉ.नरेंद्र जाधव, डॉ मुजुमदार, अनु आगा, एअर मार्शल भुषण गोखले, ख्रिस्तोफर बनींजर आदींची उपस्थिती होती. या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष इंदुमती डोणगावकर, सचिव देवयानी डोणगावकर, मार्गदर्शक कृष्णा पाटील डोणगावकर, शालेय समितीचे अध्यक्ष शिवाजी बोडखे पाटील, मुख्याध्यापक सुधाकर थोरात यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शालेय समितीचे सदस्यांनी कार्तिकेचे स्वागत केले.