
- वाळूजमहानगर – मलेशिया येथे 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान आयोजित आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शनसाला भेट देऊन राष्ट्रीय आतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहिती अवगत करण्यासाठी औरंगाबादेतील लघु उद्योजक सात दिवशाच्या मलेशियाच्या दौर्यावर रविवारी (ता.25) रोजी रवाना झाले.
मराठवाडा असोसिएशन आँफ स्मॉल इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रीकल्चर (मसिआ) ही औद्योगिक संघटना उद्योजक सदस्यांसाठी वेगवेगळ्या देशातील औद्योगिक प्रदर्शनांना भेट देण्यासाठी दरवर्षी अभ्यास दौरा आयोजीत करत असते. अशा प्रदर्शनातून नवनवीन टेक्नॉलॉजी व प्रॉडक्ट्स यांची माहिती मिळते. त्याचा उद्योगांचा विकास करण्यासाठी उपयोग होतो. तसेच अधिक व्यवसाय संधी मिळतात आणि उत्पादने तयार करण्याची प्रेरणा मिळते. या उपक्रमातून जास्तीत जास्त सदस्य, उद्योजक निर्यात व्यवसायाचा लाभ मिळवू शकतात. या वर्षी मलेशिया क्वालालपूर येथे इंटरनॅशनल आँटोपार्ट्स अॅण्ड अॅक्सेसरीज एक्सपो या औद्योगिक प्रदर्शनास भेट देण्यासाठी हा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. या अभ्यास दौर्यामध्ये प्रामुख्याने अध्यक्ष किरण जगताप, माजी अध्यक्ष भारत मोतींगे, सुनील किर्दक, उपाध्यक्ष भगवान राऊत, संयोजक श्रीराम शिंदे, सहसंयोजक अब्दुल शेख, प्रसिद्धी प्रमुख दुष्यत आठवले, कार्यकारिणी सदस्य सचिन गायके, अजय गांधी, सलील पेंडसे, हरिश्चंद्र पठाडे, उद्योजक श्रीधर नवघरे, राहुल घोगरे, तुकाराम पोटले, साईनाथ आहेर, लक्ष्मण येवले, प्रविण जोशी, सदाशिव मुळे व इतर उद्योजक सहभागी झाले आहेत.