वाळूज महानगर – वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद असलेल्या त्या 25 ते 30 वयोगटातील अनोळखी इसमाची अद्यापही ओळख पटली नाही. त्यामुळे त्याचा मृतदेह घाटीतील शीत ग्रहात ठेवण्यात आला असून त्याची ओळख पटवण्यासाठी मदत करण्याचे आवाहन वाळूज पोलिसांनी केली आहे
वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औरंगाबाद ते पुणे रोडवर लिंबेजळगाव टोलनाक्याजवळील लवकी नदीच्या पात्रात शनिवारी (ता.23) रोजी एका इसमाचा मृतदेह मिळून आला होता. त्याने आत्महत्या केली की, त्याचा खून करण्यात आला. याबाबत पोलीस तपास करत असून
या इसमाची अद्यापही ओळख पटली नाही. त्यामुळे त्याचा मृतदेह घाटी दवाखाना औरंगाबाद येथे शीतगृहात ठेवला आहे. वय अंदाजे 25 ते 30 वर्ष, रंग काळा, अंगामध्ये निळ्या रंगाची जीन्स पँट व फिकट पिवळसर रंगाचा फुल टी शर्ट, कॉलर काळी व शर्टवर दत्तवाडी नवदुर्गा उत्सव मंडळ. असे काळ्या अक्षरात लिहलेले असून खाली दिव्याचे सिम्बॉल. असे त्याचे वर्णन आहे. या इसमाबाबत काही माहिती मिळाल्यास वाळूज पोलीस ठाणे, औरंगाबाद शहर येथे संपर्क करावा. असे आवाहन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नारायण बुट्टे यांनी केले आहे.