वाळूज महानगर – सह्याद्री वृक्ष बँक, वृक्षारोपण व संवर्धन परिवार सिडको वाळूज महानगर -1 च्या वतीने परिवारासह काढण्यात आलेल्या एक दिवशीय पर्यावरण सहली निमित्ताने रविवारी (ता.18) सप्टेंबर 2022 रोजी राळेगणसिद्धी येथे भेट दिली. यावेळी राळेगणसिद्धी, निघोज व परिसराची बारकाईने पाहणी करून अभ्यास केला.
या अभ्यास दौर्यात परिसरातील एकूण 115 वृक्षमित्र आणि श्री गजानन विद्या मंदिर या शाळेचे अध्यक्ष आई जी जाधव व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी अण्णा हजारे यांच्या हस्ते अर्जुन या आयुर्वेदिक झाडाची राळेगणसिद्धी येथे लागवड करण्यात आली. तसेच वेगवेगळ्या फुल झाडांच्या कुंड्या, पर्यावरण पूरक देशी झाडे राळेगणसिद्धी परिवाराला भेट देण्यात आले. तसेच निघोज गाव मळगंगा देवीच स्वयंभू स्थान, येथील कुंड पर्यटन क्षेत्रावर वडाच्या झाडाची लागवड करण्यात आली आणि पर्यावरण पूरक देशी झाडे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टला विनामूल्य उपलब्ध करून दिली.
काय म्हणाले पद्मभूषण अण्णा हजारे –
याप्रसंगी राळेगणसिद्धी येथे पद्मभूषण अण्णा हजारे यांनी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. ते म्हणाले की, पोपटराव रसाळ यांनी राळेगणसिद्धी मधून प्रेरणा घेतली आणि लोकांना सोबत घेऊन सिडको वाळूज महानगरचा परिसर हिरवागार केला. अशीच प्रेरणा सर्व वृक्ष मित्रांनी घ्यावी. राळेगणसिद्धी जसे आदर्श गाव बनले, तसंच सिडको वाळूज महानगर आदर्श गाव तुम्ही सर्व जण मिळून बनवू शकता. यासाठी शुद्ध आचार, शुद्ध विचार, निष्कलंक जीवन, देशासाठी त्याग आणि अपमान पचवायची ताकद. हे पंच गुण पाळणे महत्त्वाचे आहे.
या परिसराची केली पाहणी –
परिसरातील ग्राम विकासाचा मीडिया सेंटर, पाणलोट क्षेत्र, यादव बाबा मंदिर, पद्मावती मंदिर, शाळेचा परिसर, म्युझियम, अण्णा हजारे यांनी केलेल्या जन आंदोलनाची चित्रीकरण या परिसराची पाहणी केली. यावेळी संदीप पठारे, संजय पठारे यांनी मार्गदर्शन केले.
आदर्श शहर करण्याचा संकल्प –
या पर्यावरण सहलीत पोपटराव रसाळ, व्यंकट मैलापुरे, जे एस मित्तल, दिनेश राऊत, संजीव शर्मा, डॉ. व्यंकटेश जांभळे, अमोल गांगर्डे, प्रकाश कदम, मच्छिंद्रनाथ कुंभार, मुकुंद करंगळे, संजय आंबेगावे, भगवान शिंदे, शैलेंद्र कोरे, बालाजी पांचाळ, दत्तात्रय तांबे, शिवाजी तांबे, हर्षद खांडरे, वैभव दोरजी, उमेश तांबट, राजेंद्र सारडा, बाळू भोसले, महेंद्र झगडे, हरी वाकळे, शिवाजी खोसे, विवेक लाड, एकनाथ शिंदे यांनी राळेगणसिद्धीचा अभ्यास करून तिथून प्रेरणा घेत सिडको वाळूज महानगर हे राळेगणसिद्धीच्या धर्तीवर एक आदर्श शहर तयार करण्याचा संकल्प वृक्ष मित्रांनी केला.