February 22, 2025

वाळूजमहानगरपतीपासून विभक्त राहणाऱ्या 29 वर्षीय महिलेला पन्नास हजार रुपये उसने देऊन व तिच्याशी लगट करून सतत दोन वर्ष अत्याचार केला. शिवाय जिवे मारण्याचीही धमकी दिली. अखेर विवाहितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याने तो आता पोलीस ठाण्यात हवा खाणार आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील जोगेश्वरी ता. गंगापुर येथील 29 वर्षीय महिला वाळूज औद्योगिक वसाहतीतील एका इंजिनिअरिंग कंपनीत काम करते. तिचे लग्न झाले होते. परंतु पतीशी पटत नसल्याने ती विभक्त राहते. ऑक्टोबर 2020 मध्ये तिने तनवीर तस्लीम शेख (वय 32) रा. जोगेश्वरी याच्याकडुन 50 हजार रुपये उसने घेतले होते. त्यामुळे त्याची व तिची ओळख झाली होती. त्यामुळे तो पैशाच्या कारणावरुन तिच्या घरी नेहमी येत होता. दरम्यान तो बळजबरीने तिच्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. तसेच तिला दिलेल्या उसने पैशाच्या कारणावरुन लगट करुन तो नेहमी म्हणत असे कि, मी तुला दिलेले उसने पैसे तु मला परत देऊ नको, तु मला आवडतेस. तु माझ्या सोबत रहा. त्यानंतर एकेदिवशी तो तिच्या घरी आला व प्रेमाच्या गोष्टी करुन तिच्यासोबत बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर तो नेहमी घरी येवुन तुझी समाजामध्ये बदनामी करेल. अशी धमकी देवुन वेळोवेळी बळजबरीने शारीरीक संबंध करत. गुरुवारी (ता. 15) सप्टेंबर 2022 रोजी रात्री 10 वाजता ती एकटी असतांना तो घरी आला व उसने घेतलेल्या पैशाच्या कारणावरुन वाद करुन बळजबरीने शारीरीक संबंध करु लागला. त्यास विरोध केला असता त्याने शिवीगाळ करुन मारहाण केली व तु जर माझे विरुद्ध तक्रार केली, तर तुला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रविवारी (ता.18) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वाबळे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *