वाळुजमहानगर – वाळूज येथील प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना डॉक्टर, पोलीस आणि सैनिक होऊन जनतेची सेवा करायची. असा हितगुज वजा मानस विद्यार्थ्यांनी इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीचे मानव संसाधन अधिकारी व्यंकट मैलापुरे यांच्याशी संवाद साधताना शनिवारी (ता.17) सप्टेंबर रोजी केला. निमित्त होते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या ध्वजावंदनाचे.
वाळुज येथील प्राथमिक आश्रम शाळा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड या कंपनीचे मानव संसाधन अधिकारी व्यंकट मैलापुरे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून हितगुज केले असता विद्यार्थ्यांनी डॉक्टर, पोलीस व सैनिक होऊन आम्हाला देशसेवा करायची. असे सांगितले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इप्का लॅबोरेटरी कंपनीचे कार्यकारी अधिकारी एकनाथ पवार, वाळूज महानगर पत्रकार संघाचे अध्यक्ष आर के भराड, शालेय समितीचे अध्यक्ष बालचंद भुजंग उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक भगवान पाटील, ज्ञानेश्वर मोकळे, भानुदास कापडे, करतारसिंग पवार, गीतांजली शिंपी, योगिता पाटील, शर्मिला देसले, आनंद डुकरे, राहुल गोमलाडू, दीपक नागरे, हरी गोरे, देवकाबाई आरगडे, भारती मोरे, अकिला शेख आदींची उपस्थिती होती.