वाळूजमहानगर – सिडको वाळूज महानगर, ग्रोथ सेंटर येथील किड्स केंब्रिज स्कूलमध्ये
हिंदीतील प्रसिद्ध कवी, कवियत्री, साहित्यकार त्यांच्या माहितीचे फलक तयार करून हिंदी दिवस साजरा करण्यात आला. संचालिका निर्मला म्हस्के, मुख्याध्यापिका हर्षदा पाटील, श्रद्धा म्हस्के उपस्थित होत्या.
यावेळी चौथी ते पाचवी या वर्गातील विद्यार्थिनींनी हिंदी भाषेवर आधारित नृत्य केले. तर पाचवी, सातवी, आठवी वर्गातील विद्यार्थ्यांनी सुंदर अशा हिंदी कविता सादर केल्या. वर्ग नववीतील विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगत पथनाट्य प्रस्तुत केले. व वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी कोडे विचारले. याप्रसंगी शिक्षिका वंदना कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका सरला रोडगे, राणी कांबळे, केतकी लीपने, मयुरी पवार, अर्चना जगताप, सरिता डावखर, विना कन्नावार, वंदना कदम, मोनिका चतुर्भुज, रूपाली चौधरी, सुवर्णा कदम, रूपाली उपळकर, मधुश्री डाके, सोनाली कुलकर्णी, सई राणे, सुवर्णा जोशी यांनी परिश्रम घेतले.