वाळूज महानगर – टोलनाक्यावर लेनमध्ये असलेल्या बोलेरो चालकाने निष्काळजी व बेदरकारपणे रिवस घेऊन कारला धडक दिली. हा अपघात वाळूज जवळील टोल नाक्यावर 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता झाला.
अजय लक्ष्मण परदेशी रा.हडपसर, पुणे हे पत्नीसह इनोव्हा कार (एम एच 12, जीझेड -2559) लिंबेजळगाव येथील टोलनाक्यावर लेनमध्ये असताना महींद्रा बोलेरो पिक-अप (एम एच 12, एस एक्स -9864) रिवस घेत असताना परदेशी यांनी हाँर्न वाजवला. तरिपण बोलेरो चालकाने
त्याच्या ताब्यातील वाहन बेदरकारपणे व निष्काळजीपणे चालवुन मागे न बघता कारला त्याची बोलेरो समोरून ठोकुन व तेथे न थांबता त्याचे ताब्यातील महींद्रा बोलेरो पिक-अप घेवुन निघुन गेला. 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता वाळूज जवळील टोल नाक्यावर झालेल्या या अपघाताप्रकरणी अजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून आरोपी महींद्रा बोलेरो पिक-अप चालकाविरुध्द वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.