वाळूज महानगर – दुचाकीवर जाणाऱ्या एका 23 वर्षीय तरुणास दोन जणांनी रस्त्यात अडवून त्याला मारहाण करून 17 हजार 700 रुपयाच्या मोबाईलसह 65 हजार रुपयाची दुचाकी असा एकूण 82 हजार 700 रुपयांचा ऐवज लुटून नेला. ही घटना बुधवारी (ता.7) रोजी रांजणगाव (शेणपुंजी) येथे रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
सुरेश गुलाब कदम (वय 23) रा. धर्माबाद जि. नांदेड, ह मु रांजणगाव (शेणपुंजी) हा बुधवारी (ता.7) रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीवर जात होता. वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे त्याला आरोपी तानाजी शिंदे व ओमकार कराळे यांनी रस्त्यात अडवून मारहाण केली. तसेच त्याच्या खिशातील 17 हजार 700 रुपयांचा किमती मोबाईल व 65 हजार रुपयाची दुचाकी (एम एच 20, एफ सी – 0455) टीव्हीएसस्टार ही बळजबरीने हिसकावून नेली. या प्रकरणी सुरेश कदम यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बांगर करीत आहे.