February 22, 2025
सिडको वाळूज महानगर एक येथील राजे छत्रपती व्यापारी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, संतोष माने पाटील, काकासाहेब बुट्टे

 वाळूज महानगर – राजे छञपती व्यापारी गणेश मिञ मंडळ, सिडको वाळूज महानगर -1 च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात परिसरातील गणेश भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान रक्तदान शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संतोष पाटील माने व वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांच्या हस्ते करण्यात आले.

राजे छत्रपती व्यापारी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक संदीप गुरमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने पाटील

आदर्श ब्लड सेंटर या रक्तपेढीच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरात सिडको वाळूज महानगर परिसरातील 19 गणेश भक्तांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी राजे छञपती व्यापारी गणेश मिञ मंडळाचे मार्गदर्शक काकासाहेब बुट्टे, मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मधुकर हांडे, उपाध्यक्ष सुरज पाटील, आयोजक प्रवीण हांडे, तिसगाव ग्रामपंचायत सदस्य शंकरमामा गावडे, सागर पाटील, पोपटराव आदीक, मंगेश आदीक, स्वप्निल अडसुळे, श्याम जाधव आदींची उपस्थिती होती. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी राजे छत्रपती व्यापारी गणेश मंडळाचे सदस्य व शिव प्रताप फाउंडेशन सिडको वाळूज महानगर -1 चे सुदाम जाधव, काकासाहेब सुलताने, सतोष सोनकांबळे, विशाल शेळके, अतुल जगताप, सुबोध गोलांडे, सौरभ चौधरी, अजिंक्य गोगावले, संदीप पाटील, सचिन शेजुळ आदींनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *