वाळूजमहानगर, (ता.22) – ब्रम्हांडनायक श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त वाळूज येथील कलानगरात आयोजित करण्यात आलेल्या त्रिदीनी अखंड हरिनाम सप्ताहात विजय ग्रंथाचे पारायण करण्यात आले.
या पारायण सोहळ्यात ह भ प सोमनाथ महाराज राऊत, बाबासाहेब तुपे, यांच्यासह शितल घोरपडे, ऋतुजा घोरपडे, रूपाली साळुंखे, वंदना कराळे, कोमल अवधूत, संगीता बोरसे, आरती दहितुले, राधा बोरसे, देवीका गोरे, शीला चौबे, गंगाबाई मुळे, उषाबाई वाघ, शांताबाई सूर्यवंशी, द्वारकाबाई घोडके, सुनीता जाधव, अलका शिंदे, मनीषा इले, संध्या जाधव आदी महिलांनी सहभाग घेतला. सप्ताहच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन महाराज मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.