वाळूजमहानगर, ता.26 – छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच झालेल्या सुपर अबॅकस नॅशनल विंटर चॉम्पियनशिप लेव्हल मध्ये वडगांव (को.) येथील साई सुपर अबॅकसचा विद्यार्थी स्वप्निल लिंबराज कदम याने संपूर्ण भारतातून तिसरा क्रमांक मिळवला.
तसेच जयश्री कदम यांना बिजनेस एक्सेललेन्सस अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार उद्योगपती सुनील देसरडा व उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीगड, गुजरात केंद्रांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत साईसुपर अबॅकसच्या 21 विद्यार्थांनी सतभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन मान्यवरांनी स्वागत केले.
यावेळी सन्मानाला उत्तर देताना कंपनी कामगारांच्या मुलांसाठी वाजवी शुल्कात दररोज वर्ग घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गणित विषयात परीपूर्ण बनविण्याची इच्छा प्रा. कदम त्यांनी व्यक्ता केली.