वाळूजमहानगर, ता.28- तरुणीसोबत व तिच्या परिवारासोबत ओळख निर्माण करून तसेच फोनवर बोलुन त्यांच्या घरी वारंवार येऊन घरात कोणी नसल्याचे पाहुन अंदाजे 35 वर्षीय आरोपीने दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. ही घटना 19 डिसेंबर रोजी रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास वाळूज परिसरात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 26 वर्षीय अंध तरुणी वाळूज परिसरात कुटुंबासह राहते. तिची लहान बहीण व भाऊ मिटमिटा, पडेगाव येथे आजी आजोबाकडे राहून तेथेच शिक्षण घेतात. आरोपी नितीन शिवाजी पारवे, (वय अंदाजे 35) रा. जेहुर, ता. कन्नड. (ह.मु रामगोपालनगर, पडेगाव) हा नेहमी त्यांच्याकडे यायचा. तो आजी आजोबांना त्याच्या गाडीने पीडित मुलीच्या घरी आणुन सोडायचा. तो होम लोन फायनान्सचे काम करतो. नितीन पारवे याने पीडित मुलीच्या कुटुंबासोबत ओळख करून तो नेहमी त्यांना फोन करून बोलायचा. तसेच पीडित मुलीला तु काय करते, घरी कोण कोण आहे असे फोनवर विचारायचा. 19 डिसेंबर रोजी रोजी नितीन पारवे हा दुपारी 12 वाजेच्या सुमारांस पीडित मुलीच्या घरी आला. यावेळी घराच्या वरच्या मजल्यावरील खोलीमध्ये कोणी नसल्याचे पाहून नितीन पारवे याने पीडित मुलीचे तोंड दाबुन जबरदस्तीने बलात्कार केला.
त्याने केलेल्या या कृत्याबाबत घरच्यांना सांगितल्यास तिलाच रागावतील म्हणुन तिने कोणास काहीही सांगितले नाही. मात्र अखेर शुक्रवारी (ता.27) रोजी हिम्मत करून नितीन पारवे याने केलेला प्रकार तिने कुटुंबाला सांगितला. त्यानंतर कुटुंबासह तिने वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिल्याने आरोपी नितीन शिवाजी पारवे, (वय अंदाजे 35), रा. जेहुर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर, ह.मु रामगोपालनगर, पडेगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर याचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.