वाळूजमहानगर, ता.27 – पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा नायलॉन मांजा हा माणसांबरोबरच पक्ष्यांसाठी घातक असल्यामुळे मांजांच्या वापरावर उच्च न्यायालयान बंदी घातली आहे़. याबाबद संबंधितांवर कठोर कारवाईचे पोलीस आयुक्तांकडून आदेश प्राप्त होतच पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे व त्यांच्या पथकाने परिसरातील झाडाझडती घेत मांजा खरेदी विक्री विरोधात गुन्हे दाखल करण्याची तंबी दिली.
संक्रातीची चाहुल लागताच सर्वांनाच पतंगाचे वेध लागतात़पतंग कापण्यासाठी अनेकांकडून चिनी मांजा, चिनी दोरा, नायलॉन मांजाचा वापर केला जातो. हा मांजा घातक असल्याने गेल्या आठ दिवसात शहरात 10 ते 12 जण गंभीर जखमी झाले. याबाबद उच्च न्यायालयाने देखील गंभीर दखल घेतली असुन, पोलिसांना कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्या पाश्वभुमिवर नियमांचं उल्लंघन करणार्यावर कडक कारवाई करण्यासाठी पोनि कृष्णा शिंदे, पोउपनि संदीप काळे, पोहेकॉ बाळासाहेब आंधळे, राजाभाऊ कोल्हे, बबलू थोरात यांच्यासह औद्योगिक परिसरातील आॅनलाईन पार्सल पुरवीणारे तसेच कुरीअयर सेंटर वार अचानपणे छापा मारुन झाडाझडती घेतली. परंतू एकाही ठिकाणी त्यांना मांजा आढळून न आल्याने त्यांनी संबंधितांना नोटीस द्वारे तंबी देवून मांजा विक्रीसंदर्भात सक्त ताकीद दिली.