वाळूजमहानगर, ता.22 – सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असिम कृपेने संत निरंकारी मंडळाच्या वाळुज (बजाजनगर) शाखेतर्फे रविवारी (ता.22) डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात महिलांसह 235 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
बजाजनगर येथील श्री जागृत हनुमान मंदीरात सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत झालेल्या या रक्तदान शिबीराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे छत्रपती संभाजीनगरचे पुर्व सेवादल क्षेत्रिय संचालक हरिलाल नाथानी यांच्या हस्ते झाले. यावेळी सेवादल क्षेत्रिय संचालक विजय बोडखे, महिंद्राचे व्हिपी राजेंद्र पवार, वाळुज शाखेचे प्रमुख शिवाजी कुबडे, संत निरंकारी मंडळाचे जिल्हा संयोजक डी जी दळवी, जागुत हनुमान मंदीर संस्थानचे अध्यक्ष अनिल पाटील. घाटी रुग्णालयाच्या जनसंपर्क अधिकारी डॉ. सुनिता बनकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या रक्तदान शिबिरात 15 महिला व 220 पुरुष अशा 235 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
“रक्त हे रस्त्यावर वाहन्यापेक्षा ते मानवाच्या धमन्यांमध्ये वाहिले पाहीजे” हा संदेश निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराजांनी संपुर्ण विश्वाला दिला. त्यांच्या उक्तीनुसार दरवर्षी अशा रक्तदान शिबीराचे आयोजन संपुर्ण विश्वामध्ये संत निरंकारी मंडळाच्या वतीने करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या 10 वर्षांपासुन वाळुज (बजाजनगर) शाखेत 22 डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते.
या रक्तदान शिबीरासाठी बजाजनगर, रांजणगाव, वाळुज, वडगाव, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाण्याहुन रक्तदाते एकत्रित झाले. या रक्तदान शिबिरात शासकिय रुग्णालय (घाटी) च्या डॉ पुजा केदार, डॉ रिद्धी कळंबकर आदीनी रक्त संकलन केले. निरंकारी मंडळाच्या वाळुज सेवादल युनिटने रक्तदान शिबीरासाठी परिश्रम घेतले.