वाळूजमहानगर, ता.14 – वाढत्या थंडीचे प्रमाण लक्षात घेत वाळूज औद्योगिक वसाहतीमधील इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीच्या वतीने कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या गरजवंताना शनिवारी ता.14) रोजी उबदार पांघरून वाटप व लहान मुलांना मिठाईचे वाटप केले.
वाळुज येथील पाल वस्तीमध्ये हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. यावेळी इप्का लॅबोरेटरीज कंपनीचे युनिट हेड संजय चौबे, मानव संसाधन विभाग प्रमुख व्यंकट मैलापूरे, एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, रमेश बिराजदार, संदीप कुलकर्णी, आजिनाथ सुरवसे, संदीप सावखेडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. ऐन कडाक्याच्या थंडीत उबदार पांघरून मिळाल्याने लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लेबरोटरीज कंपनीच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून गरजवंतांना उबदार कपडे वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचे वाळूज परिसरात सर्व स्तरातून स्वागत होत आहे.