February 21, 2025

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची तत्परता

आत्महत्या करणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण, पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची तत्परता

वाळूजमहानगर – पतीसोबत कडाक्याचे भांडण झाल्यानंतर रागाच्या भरात आत्महत्या करण्यासाठी जात असलेल्या एका 28 वर्षीय महिलेचे प्राण वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरुमे यांच्या तत्परतेमुळे वाचले. हा प्रकार बुधवारी (ता.24) रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास साजापूर येथे उघडकीस आला. गणपती विसर्जन स्पॉट पाहण्यासाठी जात असतानाच हे सत्कार्य पोलीस निरीक्षक संदीप गुरुने यांच्या हातून गणपती बाप्पांनेच केल्याची परिसरात चर्चा आहे.

पोलीस कॉलनी, साजापूर येथील कुसुम क्रुष्णा गिरी (28) या महिलेला तीन मुली व एक मुलगा असून तिचा पती डाव्या पायाने अपंग आहे. त्यामुळे कुसुम ही मोलमजुरी करते. मात्र दोघात नेहमी खटके उडत होते. बुधवारी (ता.24) रोजी या पती-पत्नीत काहीतरी कारणावरून सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले. यावेळी कृष्णा गिरी याने तिला शिवीगाळ करत तू मला फारकत दे, नाहीतर कोठेही जा. माझ्या घरात राहू नको असे बजावले. त्यामुळे कुसुम ही रागाच्या भरात धरणाच्या दिशेने आत्महत्या करण्यासाठी धावत होती. दरम्यान तिने ही हकीगत तिसगाव येथील भाऊ संतोष यास फोन करून सांगितले़.
             भाऊ भावजई धावले मदतीला
कुसुम ही आत्महत्या करण्यासाठी धरणावर गेल्याचे समजतात घाबरलेला तिचा भाऊ, भावजई व आईने तिच्या मदतीसाठी तिसगाव परिसरातील धरणाकडे धाव घेत ते तिचा शोध घेत होते. दरम्यान गणपती विसर्जन स्पॉट पाहण्यासाठी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे यांनी साजापूरचे पोलीस पाटील रशीदखान पठाण यांना साजापूर तलावावर या. असा निरोप देत गुरमे हे गणपती विसर्जनासाठी तीसगावचा तलाव पाहणी करण्यासाठी पोकॉ योगेश शेळके,स्वप्नील अवचरमल,राहुल रणविर यांच्यासह आले होते. त्याचवेळी त्यांना ही माहिती मिळाली.

गणपतीच्या रूपात आले पोलीस

ज्यावेळी कुसुम गीरी ही आत्महत्या करण्यासाठी तलावाच्या दिशेने जात होती. त्याचवेळी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप गुरमे हे आपल्या पथकासह गणपती विसर्जन ठिकाणाची पाहणी करत होते. ऐन गणपती उत्सवाची लगबग सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने जणू काही गणपतीच्या रूपात पोलीसच तिला वाचवण्यासाठी आले. अशी चर्चा परिसरात आहे.


 पोलीस निरीक्षक गुरमे यांची तत्परता –

मिळालेल्या माहितीचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी तात्काळ साजापूर येथील पोलीस पाटील रशीदखा पठाण यांना फोन करून धरणावर कोणी महिला आत्महत्येचा प्रयत्न करते का? ते पाहण्यास सांगितले. त्याचवेळी कुसुम धावत आत्महत्या करण्यासाठी धरणाकडे येत होती. ते पाहून पोलीस पाटील रशीदखा पठाण, यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या शेख इस्माईल, शेख अफरोज यांनी या महिलेस रोखले. तोपर्यंत पोलीस निरीक्षक संदीप हे घटनास्थळी पोहोचले. दरम्यान या महिलेची त्यांनी समजूत काढत तिला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *